Pages

Monday, April 14, 2014

प्रश्न 5 :: व्हिडीयोतील एखादया दृश्याचा फोटो कसा बनवता येईल ? :: How to take / capture screenshot from a video clip

प्रश्न : व्हिडीयोतील एखादया दृश्याचा फोटो कसा बनवता येईल ?


उत्तर : ह्यासाठी दोन सोपे पर्याय उपलब्ध आहेत

पर्याय 1 : VLC मीडिया प्लेयर वापरुन

आपणा सर्वांकडे VLC मीडिया प्लेयर असतोच. ह्या प्लेयरमध्ये एक सुविधा आहे जिच्या सहाय्याने आपण सुरू असलेल्या विडियोचा फोटो काढू शकतो.
  1. प्रथम VLC मीडिया प्लेयर मध्ये तुमचा विडियो सुरू करा (ज्याच्या सीनमधील फोटो काढायचा आहे तो)
  2. VLC मीडिया प्लेयर नसल्यास डाऊनलोड करण्यासाठी येथे जा Download VLC media player
  3. त्यानंतर मेनू बार वरती View वरती क्लिक करा आणि आलेल्या लिस्टमधून Advanced Controls वर क्लिक करा 
  4. तुम्हाला Play Pause Stop च्या बटनांवर नवीन चार options आलेली दिसतील त्यातील कॅमेराच चिन्ह असलेला ऑप्शन (Take a SnapShot) आपल्याला screenshot काढून देतो तुम्हाला ज्या सीनचा फोटो काढायचा आहे तेव्हा फक्त ह्यावर क्लिक करा आणि ती फ्रेम फोटो आपोआप save होईल (My Pictures नावाच्या फोल्डरमध्ये)
Extra Tip ::: SnapShot बटन शेजारीच एक लाल बटन आहे ज्याने तुम्हाला विडिओचा ठराविक भाग save करता येईल (विडिओ रेकॉर्ड cutter)....   


पर्याय 2 ::: सुरू असलेला विडिओ Pause करून Snipping Tool ने snapshot काढा ;)
  • Snipping Tool विंडोज 7,8 मध्ये उपलब्ध आहे (Start > All Programs > Accessories > Snipping Tool)
इतरही अनेक पर्याय आहेत पण सर्वात सोपे पर्याय वरती सांगितले आहेत .....

प्रश्नकर्ते : प्रकाश

No comments :

Post a Comment