Pages

Wednesday, February 12, 2014

प्रश्न 3 :: मोबाइलच्या कॅमेराने काढलेल्या फोटोंची लोकेशन कशी बदलावी :: Mobile :: How To change location of photos

प्रश्न :
 how to change storage location of captured photors?  


उत्तर :

ह्याची प्रक्रिया तुम्ही कोणत्या प्रकारचा फोन वापरता त्यावर अवलंबून आहे. 

Android स्मार्टफोनसाठी :

  1. अॅप्लिकेशन मेनू उघडा 
  2. अॅप्लिकेशन लिस्ट मध्ये  Files किंवा तुमचा कोणताही फाइल एक्सप्लोरर अथवा मॅनेजर (e.g. ES File Explorer,Astro File Explorer,etc ) असेल तो उघडा. 
  3. त्यामध्ये  Internal phone storage (/sdcard0) हा किंवा असा असेल तो पर्याय निवडा आणि ओपन करा.  
  4. तुम्हाला हवी ती फाइल निवडा.  
  5. नंतर त्या फाइलला टॅप करून होल्ड करा म्हणजे अधिक ऑप्शन दिसतील त्यातून Copy / Move हा ऑप्शन निवडा.  
  1. नंतर बॅक की (Back Key)  प्रेस करा आणि एसडी कार्ड (SD Card /External Storage/exSdCard ) मध्ये जा.   
  2. त्यानंतर तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये ती फाइल कॉपी किंवा move करायची आहे तिथे जा 
  3. त्यानंतर Paste ऑप्शन निवडा.  
  4. तुमच्या फाइल अथवा photos ची स्टोरेज लोकेशन बदललेली असेल.....  
*   move from /mnt/sdcard/DCIM to /mnt/sdcard2/DCIM

*  /mnt/sdcard/DCIM ही Android साठी डिफॉल्ट लोकेशन असते .....  

काही फोनमध्ये /mnt/SDCard0 ही internal स्टोरेज लोकेशन असते, 
आणि mnt/ExtSDCard ही Micro SD Card ची लोकेशन असते  

Posted Image*   जर तुम्हाला डिफॉल्ट लोकेशनच बदलायची असेल तर तुमच्या फोनच्या कंपनीने सोय केली असेल तरच असे करता येते अन्यथा नाही .जसे की बाजूच्या  इमेजमध्ये दिसत आहे प्रश्नकर्ते : शशिकांत  No comments :

Post a Comment