Pages

Friday, January 17, 2014

मराठीटेक विचारमंच (MarathiTech Forum)

नमस्कार,
तमाम मराठी ब्लॉग्स आणि वेबसाइटस मध्ये सर्वप्रथम सादर करत आहोत 

मराठीटेक विचारमंच (MarathiTech Forum)

सध्या अनेक प्रकारचे फोरम्स आधीच इंटरनेट विश्वात धुमाकूळ घालत आहेत. अनेक प्रकारच्या नानाविध विषयांवरती मोठ्या प्रमाणात चर्चा घडत असतात. फोरम्स अशासाठी बनवलेले असतात की सर्व मंडळी ज्यांना अमुक एका विषयावरती थोडीफार माहिती आहे त्यांनी इतरांना पडलेल्या अडचणी ऑनलाइन मदतीनेच सोडवण्यात मदत करावी. 

विकिपीडिया या सर्वात मोठ्या ज्ञानकोशाच्या म्हणण्यानुसार फोरम म्हणजे :- 

An Internet forum, or message board, is an online discussion site where people can hold conversations in the form of posted messages. They differ from chat rooms in that messages are often longer than one line of text, and are at least temporarily archived. Also, depending on the access level of a user or the forum set-up, a posted message might need to be approved by a moderator before it becomes visible.
Forums have a specific set of jargon associated with them; e.g. a single conversation is called a "thread", or topic.
A discussion forum is hierarchical or tree-like in structure: a forum can contain a number of subforums, each of which may have several topics. Within a forum's topic, each new discussion started is called a thread, and can be replied to by as many people as so wish.
Depending on the forum's settings, users can be anonymous or have to register with the forum and then subsequently log in in order to post messages. On most forums, users do not have to log in to read existing messages. 

तर एकंदरीत फोरम म्हणजे एक ऑनलाइन विचारमंच -कट्टा  की ज्याद्वारे एकमेकांना मदत दिली घेतली जाऊ शकते, प्रश्न विचारून उत्तरे दिली जाऊ शकतात अगदी काहीही...... 

                 मात्र या सर्वात एक गोष्ट नेहमी खटकते ती म्हणजे या सर्व उपद्व्यापात मराठीचं अस्तित्व कुठेच दिसत नाही. आज आपण पाहतो आपल्या भाषेत आपण आपल्या कम्प्युटर अथवा मोबाइलसारख्या यंत्रांवर इंग्लिश चायनिज, इ. भाषा सर्वाधिक वापरल्या जातात आणि आपण भारतीय मात्र आपल्या भाषांऐवजी इंग्रजीला प्राधान्य देतो :(    आणि याला तुम्ही नक्की सहमत असाल. 
               खालील Tableमध्ये इंटरनेटवरती सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या भाषा आहेत. विचार करा भारत इंटरनेट वापरणार्‍या देशांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे आणि हिन्दी भाषा प्रथम ३० मध्ये सुद्धा नाही मग बाकी भारतीय भाषा लांबच राहिल्या
1English54.9%
2Russian6.1%
3German5.3%
4Spanish4.8%
5Chinese4.4%
त्यामुळे  आमची एक कळकळीची विनंती जिथे शक्य असेल तिथे मराठी भाषेचा वापर करा शेवटी आपली भाषा आपणच जपायली हवी नाही का ?
त्यासाठीच इंटरनेटवरती मराठी तथा भारतीय भाषांचा वापर वाढावा म्हणून आमचा हा एक प्रयत्न .....

आणि सर्व अडचणी कम्प्युटर /मोबाइल / लॅपटॉप /टॅब्लेट/ इ. अशा मशीनविषयीच्या प्रॉब्लेम्सना आम्हाला विचारा आम्ही त्यांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू ...   

सध्या सुरू असलेल्या इंग्लिश फोरमस प्रमाणे किचकट न बनवता अधिक सुटसुटीत पद्धत वापरणार आहोत 


ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होईल .... 

तुमचा सहभाग सर्वात महत्वाचा असून शक्य तितकी मदत करावी अशी विनंती करतो 

No comments :

Post a Comment